महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ : एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये तैनात - पालघरमध्ये एनडीआरएफ तैनात

सतर्कतेचा इशारा म्हणून मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे; तसेच कच्चा घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पक्क्या घरात, शाळेत अथवा निवारा केंद्रात आश्रय घ्यावा, आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Two units of NDRF deployed in Palghar
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये तैनात

By

Published : Jun 2, 2020, 3:12 PM IST

पालघर - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघरमध्ये एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये दाखल झाल्या असून एक तुकडी पालघर तर दुसरी तुकडी डहाणू तालुक्यात तैनात करण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये तैनात...

हेही वाचा...Cyclone Nisarga LIVE UPDATE |महाराष्ट्रात 'निसर्ग' चक्रीवादळासाठी प्रशासन सतर्क

सतर्कतेचा इशारा म्हणून मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे; तसेच कच्चा घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पक्क्या घरात, शाळेत अथवा निवारा केंद्रात आश्रय घ्यावा, आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनामार्फत किनारपट्टीतील गावोगावी जाऊन चक्रीवादळाच्या वेळी घेण्यात येणाऱ्या खबरदारी विषयी माहिती व जनजागृती केली जात आहे. येणाऱ्या आपत्तीशी लढण्यास पुरेपूर साधन-सामग्री उपलब्ध असून आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन एनडीआरएफमार्फत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details