महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nine year old boy dies : रिसॉर्टमधील स्विमिंग पुलात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Mamacha Gav Resort

मामाचा गाव रिसॉर्ट (Mamacha Gav Resort) मधील तरणतलावात (drowning in resort swimming pool) लाइफ गार्ड नसल्याने मुलाचा बुडून (वय.9 वर्ष) मृत्यू (Nine year old boy dies) झाल्याची माहिती समोर येत आहे. मयत मुलाचे कुटुंबीय नाताळ निमित्ताने रिसॉर्ट वर आल्याची माहिती समोर येत आहे. याच रिसॉर्टच्या मालकाचा तरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी तलावातील विजेच्या तारांमधून विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता, असे बोलले जात आहे.

Nine year old boy dies
तरण तलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By

Published : Dec 27, 2022, 2:12 PM IST

पालघर/बोईसर : चिल्हार बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील मामाचा गाव रिसॉर्ट (Mamacha Gav Resort) मधील तरण तलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Nine year old boy dies) झाला आहे. बेशुद्धावस्थेत त्याला नागझरी नाक्यावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाताळ सुट्या आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मयत मुलाचे कुटुंबीय रिसॉर्ट मध्ये आले होते. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घटना घडली आहे.रुद्र देविदास वाडकर (वय.9 वर्ष) असे मयत मुलाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील कासा गावाचा रहिवासी होता.



तरणतलावात लाइफ गार्ड नसल्याने मुलाचा बुडून मृत्यू :रिसॉर्ट मधील तरणतलावात लाइफ गार्ड नसल्याने मुलाचा बुडून (drowning in resort swimming pool) मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मयत मुलाचे कुटुंबीय नाताळ निमित्ताने रिसॉर्ट वर आल्याची माहिती समोर येत आहे. याच रिसॉर्टच्या मालकाचा तरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी तलावातील विजेच्या तारांमधून विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता, असे बोलले जात आहे.


सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी : चिल्हार बोईसर रस्त्यालगत रिसॉर्ट ( Mamacha Gav resort swimming pool in Palghar ) सुरू करण्यात आले आहेत. रिसॉर्टमधील तरण तलावात जीवरक्षकांची नियुक्ती केली जात नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये पर्यटकांचे बळी जात आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची मोफत व्यवस्था होत असल्याने रिसॉर्ट मधील सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते. मयत मुलांच्या मृत्यू प्रकरणी रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details