पालघर - सफाळे येथे दरोडा टाकणाऱ्या 9 दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील दरोडेखोर मनोर भागातील असून त्यांचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पालघरमध्ये नऊ दरोडेखोर जेरबंद; सफाळे पोलिसांची कारवाई हेही वाचा - पतीने केली पत्नी व मुलाची गळा आवळून हत्या; कारण अस्पष्ट
सफाळे नजीक नवघर गावात 24 ऑक्टोबर रोजी रात्री एका शेतामधील घरात चोरट्यांनी दरोडा टाकला होता. घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 42 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सफाळे पोलिसांनी प्रथम दोन आरोपी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकारात मोठी टोळी सामील असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले 2 चाकू, 2 मोटरसायकल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 9 आरोपी पकडले असून या सर्व आरोपींना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हेही वाचा - रांजणगाव पोलिसांना मोठे यश; दोन चोरांकडून सात दुचाकी हस्तगत