पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 36 रुग्णांची भर, 45 कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू - पालघर कोरोना अपडेट्स
जिल्ह्यात आज 36 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, ग्रामीण भागामध्ये आज पालघर तालुक्यातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज अढळलेल्या 36 कोरोना रुग्णांपैकी 14 जण पालघर तालुक्यातील, 8 जण डहाणू तालुक्यातील, 12 जण जव्हार तालुक्यातील, 1 तलासरी तालुक्यातील, 1 मोखाडा तालुक्यातील आहेत.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 हजार 138 इतकी झाली असून, 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 640 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्या 480 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.