महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले 105 कोरोना रुग्ण; आतापर्यंत 32 रुग्णांचा मृत्यू

पालघर ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 513 इतकी झाली असून, 32 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Palghar corona
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले १०५ कोरोना रुग्ण; आतापर्यंत 32 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Jul 24, 2020, 8:26 AM IST

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी 105 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिलासादायक बाब म्हणजे 37 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 513 इतकी झाली असून, 32 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या 105 कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण म्हणजेच 50 रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. 33 डहाणू तालुक्यातील, 5 वाडा तालुक्यातील आणि 17 वसई ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत एकूण 1 हजार 844 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 640 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील कोरोना परिस्थिती -

राज्यात गुरुवारी 9 हजार 895 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3 लाख 47 हजार 502 झाली आहे. गुरुवारी नवीन 6 हजार 484 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 94 हजार 253 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 40 हजार 92 सक्रिय रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details