महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ११९ कोरोना रुग्ण; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ३६५ इतकी झाली असून, ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

palghar corona
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ११९ कोरोना रुग्ण; दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

By

Published : Jul 22, 2020, 9:19 AM IST

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत ११९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी ग्रामीण भागात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील एक रुग्ण पालघर व एक रुग्ण डहाणू तालुक्यातील आहे

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या ११९ रुग्णांपैकी ५३ पालघर तालुक्यातील, ३४ डहाणू तालुक्यातील, ९ जव्हार तालुक्यातील, ३ विक्रमगड तालुक्यातील, १ मोखाडा तालुक्यातील, २ वाडा तालुक्यातील आणि १७ वसई ग्रामीण भागातील आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ३६५ इतकी झाली असून, ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५९४ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील कोरोना परिस्थिती -

राज्यात मंगळवारी 8 हजार 369 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3 लाख 27 हजार 31 अशी झाली आहे. मंगळवारी नवीन 7 हजार 188 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लख 82 हजार 217 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 32 हजार 236 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details