पालघर -जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोवीस (१६ जुलै) तासात ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ९१८ इतकी झाली असून, २५ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ७१ कोरोना रुग्ण; ५३ जण कोरोनामुक्त - Palghar covid 19 update
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ९१८ इतकी झाली असून, २५ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ७१ कोरोना रुग्ण; ५३ जण कोरोनामुक्त
७१ कोरोना रुग्णांपैकी ४७ पालघर तालुक्यातील, १ डहाणू तालुक्यातील, २ विक्रमगड तालुक्यातील, ३ वाडा तालुक्यातील, २ तलासरी तालुक्यातील व १६ वसई ग्रामीण भागातील आहेत. पालघर ग्रामीणमध्ये आतापर्यंत एकूण १ हजार ४९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४०१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.