पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासात ५८ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस आढळलेल्या ५८ कोरोना रुग्णांपैकी १८ पालघर तालुक्यातील, १८ डहाणू तालुक्यातील, १ विक्रमगड तालुक्यातील, ४ वाडा तालुक्यातील, ५ तलासरी तालुक्यातील व १२ वसई ग्रामीण भागातील आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ८२६ इतकी झाली असून, २३ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४२४ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ५८ कोरोना रुग्ण; ४४ जण कोरोनामुक्त
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ८२६ इतकी झाली असून, २३ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ५८ कोरोना रुग्ण; ४४ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना परिस्थिती -
राज्यात मंगळवारी 6 हजार 741 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 67 हजार 665 अशी झाली आहे. मंगळवारी नवीन 4 हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 49 हजार 7 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 7 हजार 665 सक्रिय रुग्ण आहेत.