पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासात ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार या ३ नव्या रुग्णांमध्ये पालघर तालुक्यातील १ आणि वसई ग्रामीण मधील २ रुग्णांचा समावेश आहे. पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबधित रुग्णांची संख्या आता ७५ वर पोहोचली आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण
अहवालानुसार या ३ नव्या रुग्णांमध्ये पालघर तालुक्यातील १ आणि वसई ग्रामीण मधील २ रुग्णांचा समावेश आहे.
पालघर तालुक्यातील बोईसर नवापूर नाका येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती विरार येथे पोलीस खात्यात कार्यरत असून रुग्णाची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. वसई ग्रामीण भागात २ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. वसई तालुक्यातील अर्नाळा येथील १४ वर्षीय मुलगा कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याची कोरोना चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच ५९ वर्षीय व्यक्ती आगाशी रोड येथील रहिवासी असून ओएनजीसी कंपनीत कार्यरत आहे. सदर रुग्णाची कोरोना चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आढळून आला.