नालासोपारा (पालघर) - एका व्यक्तीने शेजार्याला घरी बोलवून त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नालासोपारा पूर्वेकडील नागिंदासपाडा येथील साईप्रसाद कॉम्प्लेक्समध्ये घडली. अमरसिंग कुणालसिंग राणा (५६) असे आरोपीचे नाव आहे. तर सुनील गणपत टेमकर (४०) असे जखमीचे नाव आहे.
पत्नी सोडून गेल्यामुळे शेजाऱ्यावर चाकूहल्ला - Nalasopara crime news
नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या जखमी सुनिल टेमकरला आरोपी राणाने घरी बोलावले. माझी पत्नी तुझ्यामुळे मला सोडून गेली, असा आरोप करत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच आरोपीने चाकूने हल्ला करून सुनिल टेमकरला जखमी केले.
तुळींज पोलीस ठाणे
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या जखमी सुनिल टेमकरला आरोपी राणाने घरी बोलावले. माझी पत्नी तुझ्यामुळे मला सोडून गेली, असा आरोप करत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच आरोपीने चाकूने हल्ला करून सुनिल टेमकरला जखमी केले.
याप्रकरणी, तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.