पालघर - धर्मनिरपेक्ष देश नसावा, मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व मिळावे, चातुवर्ण कायम रहावे असे कायम गोळवलकरांना वाटत होते. मात्र, आता लढाई आंबेडकर विरुद्ध गोळवलकर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) संविधानाला, तिरंग्याला विरोध केला होता. मात्र, आरएसएस म्हणेल तसा देश चालत नाही. आम्ही सदैव संविधानाच्या बाजूने, धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने लढत राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही वाचा -'ओवेसीला उलटं लटकवून दाढी कापेन'
पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 8 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी ते डहाणू तालुक्यातील कासा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आव्हाड पुढे म्हणाले, भाजप आणि आरएसएस देशात जातीपातीचे आणि धर्मांधतेचे राजकारण करत आहे. आम्ही मात्र, त्यांच्याविरूद्ध लढत राहणार. तसेच 2014 च्या तुलनेत आज संविधानात धर्मनिरपेक्ष या शब्दाची अत्यंत गरज आहे. ते बंधनकारक असावे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -बीड जिल्हा परिषदेत भाजपने मैदान सोडले, पंकजा मुंडेंकडून पराभव मान्य