महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारांनी केला भाजपच्या हेमंत सवरांचा पराभव

कोकणा समाजाचा जात फॅक्टर चालल्यानेच याठिकाणी भाजपचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागातील स्थानिक उमेदवार हा प्रचारातील मुद्दा, विकास कामांबाबत नाराजी, महाआघाडीच्या घटकपक्षाची साथ यामुळे हा विजय झाल्याचे बोलले जात आहे.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारांनी केला भाजपच्या हेमंत सवरांचा पराभव

By

Published : Oct 25, 2019, 6:09 PM IST

पालघर - जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री विष्णू सवरा यांचे सुपुत्र हेमंत सवरा यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल भुसारा यांनी केला आहे. कोकणा समाजाचा जात फॅक्टर चालल्यानेच याठिकाणी भाजपचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागातील स्थानिक उमेदवार हा प्रचारातील मुद्दा, विकास कामांबाबत नाराजी, महाआघाडीच्या घटकपक्षाची साथ यामुळे हा विजय झाल्याचे बोलले जात आहे.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारांनी केला भाजपच्या हेमंत सवरांचा पराभव

हेही वाचा -हरियाणा विधानसभा : अपक्ष अन् बंडखोर आमदारांचा भाजपला पाठिंबा, सत्ता स्थापनेच्या निकट

गेली 11 वर्ष या भागातील कामे करण्यात भाजप लोक प्रतिनिधी निष्क्रिय ठरले होते. मला जनतेने निवडून दिले आहे. या मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहील आणि उद्या पासुन मी जनतेच्या कामांना सुरूवात करेन, असे महाआघाडीचे उमेदवार सुनिल भुसारा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाआघाडी यांच्यात प्रमुख लढतीत होती. महायुतीकडून माजी मंञी विष्णू सवरा यांचे पुत्र हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या नाराज गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवार बदलण्याबद्दल सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी यावर दुर्लक्ष करत जव्हार, विक्रमगडमधील नाराज गटाची समजुत काढली. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा यांचा 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विष्णू सवरा यांनी पराभव केला होता.

हेही वाचा -'रोहित आणि राम शिंदेंची भेट हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण'

या मतदारसंघात वारली समाजासमोर कोकणा समाज आहे. सुनिल भुसारा हे कोकणा समाजाचे आहेत. त्यामुळे येथे कोकणा समाजाची मतांनी त्यांच्या विजयाला हातभार लावल्याचे बोलले जाते. तसेच महाआघाडीतील या मतदारसंघात दोन्ही काँग्रेसपेक्षा कम्युनिस्ट पार्टीचा प्रभाव येथे आहे. कम्युनिस्ट पार्टीबरोबर बविआची भक्कम साथही भुसारायांना लाभली. मतमोजणीच्या 25 व्या फेरीपर्यंत भुसारा 15 ते 20 हजाराच्या लीडवर होते. भुसारा यांना 87 हजार 442 मते तर सवरा यांना 66 हजार 104 मते होती. मतदारसंघात विकास कामे नाहीत याच नाराजीचा फटका सवरा यांना बसला आहे. सवरा यांना भाजपमधील काही नाराजांचा विरोध, महायुतीच्या घटक पक्षाने किती काम केले? यावर चर्चा रंगली होती. तर महाआघाडीतील काँग्रेस राज्य सचिव मनिष गणोरे यांनी हा विजय जनतेचा असुन यापुढे सर्व निवडणुका महाआघाडीकडून लढल्या जातील अशी माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details