नवी मुंबई -ऐरोली परिसरातून एका ॲमेझॉन कंपनीच्या नावे चालविल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा (Bogus call center) नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नौशाद रजी अहमद शेख (24), सौरभ सुरेश दुबे (26), आसिफ अमित शेख (23), मेहताब आयुब सय्यद( 27), हुनेद शब्बीर कोठारी( 35), सूरज मोहन सिंग (25), धर्मेश राकेश सालीयन (32) या सात जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर हाईट सेक्टर 20 मधील इमारतीच्या फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू होते. त्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी सायबर एक्सपर्टसह या कॉल सेंटरवर छापा टाकला. यावेळी संबंधित कॉल सेंटरमधून दहा लॅपटॉपच्या साह्याने व्हिओआयपीच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फोन करत व त्यातून त्यांची फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे.
ॲमेझॉन अकाउंट हॅक झाल्याचे सांगत करत असत फसवणूक