पालघर : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
तर सकाळी बंडखोरीची भूमिका कायम ठेवत गीता जैन यांनी हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.