महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे ज्यांचा रोजगार बुडाला त्यांना सरकारने पैसै द्यावे - नंदकुमार पाटील - Covid-19 latest news

कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे दुकाने वगळता इतर सर्व ठिकाणे, दुकाने बंद करण्यात आली आहेत. या बंदमुळे मजुरी करणाऱ्या मजुरांचा उदरनिर्वाह साधन पुरविणारे काम आता बंद झाले आहे. या बंदच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यांच्या खात्यात पैसे टाकावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच वाडा तहसीलदार यांना निवेदनामार्फत सादर केली आहे.

कोरोना प्रभाव
कोरोना प्रभाव

By

Published : Mar 22, 2020, 10:45 AM IST

Updated : Mar 22, 2020, 12:22 PM IST

पालघर - कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर, जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारी दुकाने वगळता इतर सर्व ठिकाणे, बाजारपेठ आदि सर्व बंद दिसत आहे. या बंदमुळे मजुरी करणाऱ्या मजुरांचा उदरनिर्वाह साधन पुरविणारे काम आता बंद झाले आहे. या बंदच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यांच्या खात्यात पैसे टाकावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच वाडा तहसीलदार यांना निवेदनामार्फत सादर केली आहे.

भाजपने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातही याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १४४ लागू करण्यात आली असून खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये महत्वाच्या वस्तूंची दुकाने वगळता इतर बाजारपेठ, मॉल, सिनेमागृह आदी सर्व बंद आहेत. मात्र, या बंदचा परिणाम मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांवर येऊन पडला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यांच्या खात्यात पैसै जमा करून सरकारने त्यांना मदत करावी, असे निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोपवले आहे. यासोबतच, आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटायजर व मास्क रेशन दुकानातून उपलब्ध करून देण्यात यावे अशीही मागणी त्यांनी निवेदनामार्फत केली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणांवर निर्जंतुकीकरण करण्यात यावे, जेणेकरून या विषाणूंचा फैलाव आणि अटकाव मिळविण्यासाठी मदत होईल, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

Last Updated : Mar 22, 2020, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details