पालघर - पूर्वेकडील पेल्हार-नालासोपारा रेल्वे स्थानक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका उद्भवत आहे.
नालासोपाऱ्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवापूर्वीच केली होती रस्तेदुरूस्ती - nalasopara road conditions
नालासोपारा पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गणेशोत्सवापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम असल्याने महिनाभराच्या आतच हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे.
नालासोपाऱ्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य
नालासोपारा पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. गणेशोत्सवापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम असल्याने महिनाभराच्या आतच हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रहदारीला अडथळा येत आहे. दरम्यान, तुळींज रोड ,बिलालपाडा, संतोष भवन येथील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.