पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यातील कुडुस येथे शीतपेय बनवणाऱ्या हिंदुस्थान कोका-कोला कंपनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपली जमीन गेल्याचा आरोप नागेश जाधव या शेतकऱ्याने केला आहे. तसेच मागील 23 वर्षे कंपनीने जमिनीवर अतिक्रमण करून गौण खनिजाचे उत्खनन केले आहे. त्या जागेत काँक्रिटचा रस्ता बनवल्यानंतर त्याचा काही मोबदलाही दिला नसल्याची तक्रार नागेश जाधव यांनी केली. आपल्याला न्याय द्या, अन्यथा आपण उपोषण करू अशा इशारा त्यांनी दिला आहे.
'कोका-कोला'ने 23 वर्षे माझी जमीन वापरली... न्यायासाठी शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा - शेतकऱ्याची कोकाकोला विरोधात तक्रार
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोका-कोला कंपनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपली जमीन गेली असून कंपनीने मागील 23 वर्षे आपली जमीन विनामोबदला वापरल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. आपल्या न्याय आणि हक्कासाठी या शेतकऱ्याने उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा...सहिष्णाच्या सहिष्णुतेने उजळले 'जिजा'चे भाग्य..! आठव्या 'नकोशी'ला मिळाले आई-वडिलांचे छत्र
वाडा तालुक्यातील कुडुस येथे असणारी कोका-कोला ही शीतपेय बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचा सर्वात मोठा प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. शेतकरी नागेश पाटील यांनी, कंपनीने अतिक्रमीत केलेली जागा मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्नी व मुले यांच्यासह आमरण उपोषण केले होते. त्यावेळी कंपनीने लेखी पत्र देत लवकर निर्णय कळवू असे सांगितले होते. मात्र, अद्याप कंपनी व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणेने कोणतीही दाद दिली नसल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.