पालघर - जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत हद्दीतील इयत्ता नववी ते बारावी या वर्गाच्या शाळा सुरू करण्याची परवानगी माध्यमिक विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसल यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाला दिले आहे. मात्र, शाळा सुरु करण्यासाठी शालेय व्यवस्थापन आणि विद्यार्थी पालक समितीची परवानगी आवश्यक आहे
पालघर; नगरपरिषद आणि नगरपंचायत भागातील शाळा होणार सुरू..पण - palgher school started news
पालघर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दीतील शाळा सुरू करण्यासाठी शालेय व्यवस्थापन आणि विद्यार्थी पालक समितीची परवानगी आवश्यक आहे. तसेच शाळेत येताना शिक्षकांना कोरोनाची चाचणी करण बंधनकारक आहे.
4 जानेवारी 2021 पासून शाळा सुरू
राज्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन काही महिने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील काही भागात इयत्ता नववी ते 12 वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पालघर जिल्ह्यात हा निर्णय त्यावेळी तूर्तास घेण्यात आला नव्हता. राज्यातील काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजताच पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गाने शाळेच्या ठिकाणी गर्दी केली होती मात्र त्या दिवशी शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यावेळी जिल्हा प्रशासनाकडून झाला आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले होते.
वाडा तालुक्यातील 24 शाळा सुरू....
पालघर जिल्ह्यात पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वाडा, तलासरी नगरपरिषद,नगरपंचायती आहेत. या भागात इयत्ता 9 वी ते 12 वी इयत्ता वर्गाच्या 24 शाळा सुरू करण्यात असल्याची माहिती वाडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी जयवंत खोत यांनी बोलताना माहिती दिली.
शाळेय व्यवस्थापन, विद्यार्धी पालक समितीची समंती आणि शिक्षकांची कोवीड चाचणी बंधनकारक...
पालघर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत हद्दीतील शाळा सुरू करण्यासाठी शालेय व्यवस्थापन आणि विद्यार्थी पालक समितीची परवानगी आवश्यक आहे. तसेच शाळेत येताना शिक्षकांना कोरोनाची चाचणी करण बंधनकारक आहे.