पालघर -नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसतातील नायजेरियन नागरिक राहत असलेल्या एका अनधिकृत इमारतीवर वसई विरार महापालिकेने हातोडा चालवला. या कारवाईत नायजेरियन नागरिक राहत असलेल्या जवळपास २० सदनिकांवर हातोडा चालवण्यात आला आहे. महापालिकेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नालासोपाऱ्यात नायजेरियन नागरिकांच्या अनधिकृत इमारतीवर हातोडा; महापालिकेची कारवाई
नालासोपार पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील जय माता इमारतीवर महापालिकेने कारवाई केली. या इमारतीमध्ये २० ते २५ नायजेरीअन बेकायदेशीररित्या राहत असल्याचे समोर आले आहे.
नालासोपारा प्रगती नगर येथील जय माता दि नावाच्या इमारतीमध्ये २० ते २५ नायजेरीअन बेकायदेशीररित्या राहत होते. नायजेरीअन नागरिकांची इमारत म्हणून जय माता दि या तीन मजली इमारतीची ओळख होती. या इमारतीमध्ये नायजेरिअन नागरिकांच्या गैरधंद्याला उत आला होता. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. ही इमारत खाली करण्यासाठी महापालिकेकडून नोटीस बाजाविण्यात आली होती. अखेर महापालिकेकडून या इमारतीवर हातोडा चालवण्यात आला. या अनोख्या कारवाईमुळे प्रगती नगर येथील स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.