पालघर -जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवून एका डॉक्टकडून सहकर्मचारी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवारी डहाणू पोलीस ठाण्यात सदर डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सदर पीडितेने गुरुवारी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार, मुंबईस्थित आरोपी डॉक्टरने पीडितेवर जुलै २०१८ ते सप्टेंबर २०२० या काळात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे नमूद केले आहे. तसेच, गर्भवती राहिल्यानंतर त्याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. पीडितेने गर्भपात करण्यास नकार दिल्यावर त्याने तिला दम देऊन त्यांच्यातील काही व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तसेच तिला वारंवार त्रास देऊन शोषण करायचा असेही दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.