पालघर- बहुजन विकास आघाडी व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघा संदसर्भात चर्चा सुरू असून बहुजन विकास आघाडी हा आमचा घटक पक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेसचे अनेक आमदार शिवसेना- भाजपच्या संपर्कात असल्याच्या या दोन पक्षांकडून बातम्या दररोज माध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे या सर्वांमुळे असंतुष्ट सेना-भाजपमधील अनेक नेतेही काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी सांगितले. लायन्स क्लब हॉल येथे नवनियुक्त काँग्रेस जिल्हा कार्यकरणीच्या पदग्रहण समारंभानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सेना-भाजपमधील अनेक नेते आमच्याही संपर्कात - मुजफ्फर हुसेन - नेते
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून दहा-पंधरा नेत्यांची आयात करून सत्ताधारी व विरोधकपण आपणच अशा प्रकारचे आगामी निवडणुकीचे चित्र रंगवण्याचा सेना-भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, हा त्यांचा गैरसमज असून असे चित्र निवडणुकीत राहणार नाही. या दोन्ही पक्षांतील अनेक नेते आमच्याही संपर्कात असल्याचे मुजफ्फर हुसेन म्हणाले.
मुजफ्फर हुसेन