महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याचे महसूल मंत्री घटनाबाह्य काम असल्याचा खासदार राजेंद्र गावितांचा आरोप - राजेंद्र गावित महसूल मंत्री आरोप

मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमीन हस्तांतरण होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यावरून राजेंद्र गावित यांनी महसूल मंत्र्यांवर घटनाबाह्य काम केल्याचा आरोप केला आहे.

Rajendra Gavit
राजेंद्र गावित

By

Published : Mar 9, 2021, 12:08 PM IST

पालघर - आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींकडे होत आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे घटनाबाह्य व बेकायदेशीररित्या काम करत असल्याचा आरोप पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. आदिवासींच्या जमीन विक्रीची चौकशी करावी, अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

खासदार राजेंद्र गावित यांनी राज्याच्या महसूल मंत्र्यांवर आरोप लावले

महसूल मंत्र्यांवर आरोप -

महाराष्ट्रात आदिवासी जमीन बंदी हस्तांतरणाचा कायदा असतानाही मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासींचे जमीन हस्तांतरण बिगर आदिवासींकडे होत आहे. महसूलमंत्री, महसूल विभाग या सर्व परवानग्या देत असल्याचा गंभीर आरोप पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मुंबई, ठाणे, पनवेल भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आदिवासींच्या जमिनीची मागणी वाढली आहे.

आदिवासी जमीन विक्रीच्या चौकशीची मागणी -

आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींकडे होत आहे, असा आरोप खासदार गावित यांनी केला आहे. आदिवासींच्या जमीन विक्रीची चौकशी करावी, अशी मागणी खासदार गावित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details