महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई द्या-खासदार कपिल पाटील - MP Kapil Patil over farmers compensation

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असे निवेदन वाडा तहसील कार्यालय यांना भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील व सरचिटणीस रोहन पाटील यांनी दिले.

खासदार कपिल पाटील
खासदार कपिल पाटील

By

Published : Jan 5, 2021, 4:21 PM IST

Updated : Jan 5, 2021, 6:46 PM IST

पालघर- परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असे निवेदन वाडा तहसील कार्यालय यांना भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील व सरचिटणीस रोहन पाटील यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई द्या

जिल्ह्यातील वाडा तालुक्यात 19 हजार 471 शेतकरीवर्गाचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची 2 कोटी 99 लाख ही रक्कम भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांची खाती ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत .त्यामुळे शेतकरीवर्ग नुकसान भरपाईपासून वंचित राहिला. ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी

हेही वाचा-ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात

जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड भागात परतीच्या पावसाने मोठे नुकसान...
जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विक्रमगड आणि वाडा भागात मोठे नुकसान झाले. तसेच पालघर,जव्हार, मोखाडा भागातही नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसानीचा फटका वाडा तालुक्याला बसला आहे. तालुक्यात 14 हजारहून अधिक हेक्टरी क्षेत्र भात पीक लागवडीखाली आहे. तर 10 हजार 156 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा-अमिताभचे मत जाणून घेण्यासाठी शेतकरी आंदोलक दिल्लीहून आले मुंबईला

मदत मिळाली पण खातेदारांच्या खात्यात जमा नाही...
परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्ह्यात झाले आहेत. सरकारकडून नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. मात्र, नुकसान भरपाई खात्यात जमा झाली नाही. वाडा तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 2 कोटी 99 लाख ही रक्कम भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यात आली. मात्र, बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खाती ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात ती रक्कम जमा झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details