महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भूकंप बळी ठरलेल्या रिष्या मेघवाले कुटुंबाला खासदार गावितांची मदत - आश्वासन

डहाणू आणि तलासरी भागातील नागझरी वसावलपाडा परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या 3.8 रिस्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात रिष्या मेघवाले  यांचा मृत्यू झाला. खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्याचा खासदार म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत कुटुंबीयांना मदतीचा हात देत नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्यासाठी धीर दिला.

भुकंप बळी ठरलेल्या रिष्या मेघवाले कुटूंबाला खासदार गावितांची मदत

By

Published : Jul 26, 2019, 6:55 PM IST

पालघर (वाडा) - भूकंपाच्या धक्क्याने अंगावर घर कोसळून मृत्यू झालेल्या रिष्या दामा मेघवाले यांच्या घरी माजी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा खासदार राजेंद्र गावित यांनी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले. गावित यांनी मृताच्या कुटुंबाला 1 लाखाचा धनादेश सुपूर्त करत मदतीचा हात दिला.

भुकंप बळी ठरलेल्या रिष्या मेघवाले कुटूंबाला खासदार गावितांची मदत

यावेळी आमदार अमित घोडा, डहाणू तहसीलदार राहुल सारंग, शिवसेनचे राजेश पारेख, तलासरी पोलीस निरीक्षक अजय वसावे, कर्मचारी व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डहाणू आणि तलासरी भागातील नागझरी वसावलपाडा परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या 3.8 रिस्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात रिष्या मेघवाले यांचा मृत्यू झाला. मेघवाले यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत चार लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी देण्यात आला. यानंतर खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्ह्याचा खासदार म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत कुटुंबीयांना मदतीचा हात देत नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्यासाठी धीर दिला. यावेळी खासदार गावितांनी गावकऱ्यांशीही संवाद साधत ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे. त्या प्रत्येक घराचा तातडीने पंचनामा करून योग्य ती मदत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून तातडीने सर्वोतोपरी मदत देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन गावित यांनी दिले. शासन आणि वैयक्तिक दिलेल्या मदतीचा योग्य वापर करण्याचा सल्ला त्यांनी कुटुंबीयांना दिला. या वेळी अधिकाऱ्यांना सूचना देताना गावितांनी घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात येणारी घर भूकंप रोधक किंवा रेट्रोफिटिंग ची कशी करता येतील यासाठी सर्व्हे करून नियोजन करण्याचे सांगत लोकप्रतिनिधी म्हणून शासनामार्फत सर्वोतोपरी मदत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details