पालघर : नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर १६ भारतीयांसह बंदी (stranded on ship in Nigeria) करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी; याकरता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि प्रसार माध्यमांचे उंबरठे झिजवते (mother struggle to rescue son stranded on ship) आहे. सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांच्या सुटकेकरता प्रयत्न करावे, अशी याचना त्यांनी सर्वांना केली आहे. याच मागणीसाठी संपदा शिंदे यांनी १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नायजेरियामध्ये नजरकैदेत :विरार-मनवेल पाडा येथील वेदश्री सोसायटीत राहणाऱ्या संपदा शिंदे यांचा मुलगा प्रणव संतोष शिंदे हा ओएसएम फिल्ट मॅनेजमेंट या शिपिंग कंपनीत शेफ म्हणून नोकरी करतो. चेन्नईस्थित ही कंपनी नायजेरिया येथे क्रूड ऑइल काढणाऱ्या जहाजाला सेवा देत आहे. प्रणव १८ जुलै रोजी या कंपनीत कामाला लागला होता. ९ ऑगस्टपासून हे जहाज नायजेरियातील इक्वेटोरियोल गिनीमध्ये आहे. या ठिकाणी बेकायदेशीर क्रूड ऑइल उचलले म्हणून हे जहाज नायजेरियामध्ये नजरकैदेत आहे. या जहाजावर एकूण २६ सिफेअर्स आहेत. त्यात १६ भारतीयांचा समावेश असून; त्यात प्रणव हा विरारचा आहे. त्यांना नायजेरिया-मेलाबो येथे ताब्यात घेण्यात आले (Mother Struggle to Rescue son) आहे.