महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई विरारमध्ये 24 तासात कोरोनाचे 93 नवे रुग्ण; उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू - पालघर कोरोना रुग्णसंख्या बातमी

आज वसई-विरार महानगरपालिका हद्दीत 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 938 वर पोहचली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर आज उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वसई विरारमध्ये 24 तासांत 93 नवे रुग्ण
वसई विरारमध्ये 24 तासांत 93 नवे रुग्ण

By

Published : Jun 19, 2020, 10:24 PM IST

पालघर - वसई-विरारमध्ये कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान माजवले असून गेल्या 24 तासात 93 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आज 20 जाणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजार 938 पार पोहोचला आहे.

आज वसई-विरार महानगरपालिका हद्दीत 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 938 वर पोहचली आहे. मात्र, त्याचवेळी दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर आज उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 74 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षेत्रात आतापर्यंत 1 हजार 94 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, उर्वरित 770 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details