पालघर : शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या भूमीत महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे ( Bharat Jodo Yatra in Maharastra ) जोरदार स्वागत करण्यास संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पालघर जिल्हा ही याला अपवाद नाही. सर्व सुशिक्षित, बुद्धिजीवी आणि पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मोईज शेख ( District Congress Committee Working President Moiz Shaikh ) यांनी केले आहे.
Bharat Jodo Yatra : पुरोगामी महाराष्ट्रात आगमन होणाऱ्या भारत जोडो यात्रेचे उत्साहात स्वागत करा - मोईज शेख - Barat Jodo Yatra
शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या भूमीत महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे ( Bharat Jodo Yatra in Maharastra ) जोरदार स्वागत करण्यास संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पालघर जिल्हा ही याला अपवाद नाही. सर्व सुशिक्षित, बुद्धिजीवी आणि पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मोईज शेख ( District Congress Committee Working President Moiz Shaikh ) यांनी केले आहे.
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा - जिल्ह्याचे नेते आणि लोकप्रिय समाजसेवक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 500 काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती , मोईज शेख यांनी दिली आहे. पालघर मधील प्रसिद्ध आदिवासी नेता आणि समाजसेवक काळूराम काका दोधडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच पालघर हा पेसा कायद्याखाली मोडणारा आदिवासी जिल्हा आहे. बहुल आदिवासी समाज या भागात आहे. येथील लोकसंस्कृती लोकसंगीत याचेही सादरी करण केले जाणार आहे. विशेष प्रसिद्ध असलेला तारपा डान्स हे प्रमुख आकर्षण असणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
ही यात्रेची उद्गिष्ट्ये - या यात्रेचा उद्देश धर्मांध शक्ती विरुद्ध लढा, बेरोजगारीवर उपाययोजना, जातीयवादी आणि हुकूमशाही वृत्तीचा निषेध करणे हा राहणार आहे. गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाची वाचा फोडणे हे या यात्रेचे मुख्य काम राहणार आहे. जवळ जवळ 3500 किलोमिटर चालणारी ही यात्रा जम्मू-काश्मीरला फेब्रुवारी 2023 ला पोहोचणार असल्याचे मोईज शेख यांनी सांगितले.
TAGGED:
Barat Jodo Yatra