महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मतः शारीरिक व्यंग असतानाही 'तो' करतोय परिस्थितीवर मात.. - Mohan Singh overcomes physical satire

देवाने जन्मताच दिलेल्या शारीरीक व्यंगावर मात करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करणारा मोहनसिंग कौतुकाचा विषय ठरतो आहे. तो एका तबेला मालकाकडे काम करतो.

शारीरीक व्यंगावर मात करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करणारा मोहनसींग

By

Published : Nov 7, 2019, 8:58 AM IST

पालघर -देवाने जन्मताच शारीरिक व्यंग दिले. मात्र, खचून न जाता जगण्यासाठी धडपड करणारा विरारचा एक २५ वर्षीय तरुण सद्या दिव्यांगांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तो एका हाताने खोल विहिरीत पोहतो, एका हाताने उंच नारळाच्या झाडावरही चढतो, नारळही एका मिनिटात सोलतो इतकेच नव्हे तर वजनदार बुलेटही सराईतपणे लिलया चालवतो. हा कोणी सर्कसमधील कलाकार नाही तर विरार येथील मोहनसिंग ठाकूर हा पंचवीस वर्षीय तरुण आहे.

शारीरिक व्यंगावर मात करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करणारा मोहनसींग

जन्मताच मोहनसिंग याचा एक हात अधू आहे. मात्र, आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता त्याने आपल्या उपजीविकेचा मार्ग स्वत:च शोधून काढला आहे. विरार येथे राहणाऱ्या मोहनसिंगचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सद्या तो एका तबेला मालकाकडे काम करतो.त्याचे लग्नही झाले असून त्याला दोन मुली आहेत. रोजचे 15 गाईंना धुण्याचे, त्यांचे शेण उचलण्याचे तसेच त्यांना चारा-पाणी देण्याचे काम तो कुशल कामगारासारखे करीत असतो. धडधाकट माणसेही कामधंदा न करता भिक मागतात. मात्र, एक हात नसतानाही कोणावर अवलंबून न राहता आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणारा मोहनसींग सद्या कौतुकाचा विषय ठरतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details