पालघर/वसई :वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांचे छायाचित्र प्रदर्शन वसई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भरवण्यात आले. वसई-गोखिवरे येथील ग्रीष्मा गार्डन येथील एका सभागृहात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे बुधवारी उद्घाटन झाले. या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मनसेने पालिका क्षेत्रात कोविड-19 काळात झालेल्या बेफाम अनधिकृत बांधक़ामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वसई-विरार शहर महापालिकेविरोधात मनसेचे अनोखे चित्र प्रदर्शन - MNS unique picture exhibition
या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मनसेने पालिका क्षेत्रात कोविड-19 काळात झालेल्या बेफाम अनधिकृत बांधक़ामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शहर सुनियोजित वसवण्याची जबाबदारी पालिका अधिकार्यांची असताना; अधिकारीच अनधिकृत बांधकामांना उत्तेजन देत असल्याने या छायाचित्र प्रदर्शनातून नागरिकांत जनजागृती करण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याची माहिती या वेळी मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
मागील काही वर्षांत वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आरक्षित जागा, वनविभाग, महसूल आदी जागांवर बेफाम अनधिकृत बांधकामे झाली आहेत. पालिका क्षेत्रातील पाणथळ जागाही शिल्लक राहिलेल्या नाहीत. या अनधिकृत बांधकामांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, तहसीलदार व वनविभागाचे अधिकारी कारणीभूत असून; या बांधकामांमुळे वसई-विरार शहरातील नागरिकांना पावसाळ्यात शहरात पाणी तुंबत असल्याने मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप या वेळी मनसे पदाधिकार्यांनी केला.
शहर सुनियोजित वसवण्याची जबाबदारी पालिका अधिकार्यांची असताना; अधिकारीच अनधिकृत बांधकामांना उत्तेजन देत असल्याने या छायाचित्र प्रदर्शनातून नागरिकांत जनजागृती करण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याची माहितीही या वेळी मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.