महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीच्या रिक्षाला 'मनसेचे इंजिन' - ठाणे

राज ठाकरेंच्या आदेशाने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची मनसेची भूमिका ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्पष्ट केली आहे.

मनसेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

By

Published : Apr 26, 2019, 12:02 AM IST

पालघर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या 'रिक्षा'ला मनसेचे इंजिनही पुढे ढकलणार आहे.

मनसेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

राजगडावर पालघरमधील कार्यकर्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची चर्चा झाली. राज ठाकरेंच्या आदेशाने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची मनसेची भूमिका जाधव यांनी स्पष्ट केली. पालघर मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचा प्रचार करणार आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, जनता दल, रिपब्लिकन पक्ष गवई व कवाडे गट, दलित पँथर यांच्यासह विविध संघटना व स्थानिक पक्षांची महाआघाडी झााली आहे. त्यातच या महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामील झाल्याने महाआघाडीची ताकद अधिकच वाढली आहे.

पालघर लोकसभा मतदार संघात एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित विरुद्ध महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव या २ उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details