पालघर- जिल्ह्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्पात संगणक शिक्षकांच्या भरतीसाठी सोनोपंत दांडेकर या महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा सुरू आहे. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करून परीक्षा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. नोकर भरतीत स्थानिकांना डावलले जात असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले.
मनसे आक्रमक : नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या; पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांची धरपकड - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात डहाणू अंतर्गत मागील 8 वर्षांपासून सुशिक्षित स्थानिक तरुण कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. मात्र, त्यांना कामावरून कमी करून ही नोकर भरती घेण्यात येत होती.
आंदोलनादरम्यान, पालघर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात डहाणू अंतर्गत मागील 8 वर्षांपासून सुशिक्षित स्थानिक तरुण कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. मात्र, त्यांना कामावरून कमी करून ही नोकर भरती घेण्यात येत होती. त्यासाठी बाहेरील तरूण मोठ्या प्रमाणात हजर होते.
त्यामुळे पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असताना देखील येथील तरुणांना डावलले जात असल्याने हे आंदोलन करण्यात आले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत मनसे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.