पालघर -जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा यांनी देखील आपल्या आईसोबत शेतात भात पेरणी केली आहे. आमदार श्रीनिवास वनगा यांचा भात पेरणी करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार श्रीनिवास वनगांनी केली भात पेरणी भात पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल
पालघरमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली आहे. पावसाने विश्रांती दिल्याने भात पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. तलासरीमधील कवाडे येथे आपल्या शेतात जाऊन पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी भात पेरणी केली. त्यांचे वडील दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे देखील शेती करत होते. चिंतामण वनगा हे तीन टर्म खासदार आणि एक टर्म आमदार होते. मात्र तरी देखील ते नियमीत शेतातील काम करत होते. आता त्यांचे पुत्र आमदार श्रीनिवास वनगा देखील शेतीची कामे करत आहेत. श्रीनिवास वनगा हे कधी आपल्या शेतात भात कापणी करताना दिसतात, तर कधी भात पेरणी करताना दिसतात. असाच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा -अनलॉक : पुण्यात सोमवारपासून मॉल-हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत राहणार सुरू