पालघरमधील दुर्लक्षित क्रीडा संकुल अद्ययावत करणार - श्रीनिवास वनगा - पालघर क्रीडा संकुल बातमी
क्रीडासंकुलासाठी सध्या अडीच एकर जागा मंजूर असून पालघर हे जिल्हाचे ठिकाण असल्याचे लक्षात घेऊन आणखी १९ एकर जमिनीची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. जिल्ह्यात खेळाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिली. बैठकीनंतर उपस्थित सदस्यांनी तालुका क्रीडा संकुलाची पाहणी केली.
पालघर - येथील तालुका क्रीडा संकुल इमारत अद्ययावत करण्यासंबंधातील आयोजित आढावा बैठकीत फुटबॉल क्रीडांगण व व्यायाम शाळा बांधकाम, जॉगर्स ट्रॅक आदी खेळ विषयक सुविधांबरोबरीने क्रीडा संकुलापर्यंतचा रस्ता, क्रीडा संकुलास संरक्षक भिंत बांधणे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी कामांना व कामांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
क्रीडासंकुलासाठी सध्या अडीच एकर जागा मंजूर असून पालघर हे जिल्हाचे ठिकाण असल्याचे लक्षात घेऊन आणखी १९ एकर जमिनीची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. जिल्ह्यात खेळाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिली. बैठकीनंतर उपस्थित सदस्यांनी तालुका क्रीडा संकुलाची पाहणी केली.
तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार सुनील शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा, समितीचे सदस्य पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, सा.बां.विभागाचे उप अभियंता महेंद्र किणी, गटविकास अधिकारी जगताप, गटशिक्षणाधिकारी जाधव व तालुका क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव कलावंत व त्यांचे सहकारी वाघ, नायब तहसीलदार गडग आदी उपस्थित होते.