विरार - विरारच्या अर्नाळा येथील लॉजमध्ये ( Rape lodge in Virar Arnala ) 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर तिच्यावर बलात्कार ( Minor Girl Raped ) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने या मुलीची सुटका करून तिच्यावर बलात्कार करणार्या तिघांना अटक ( Three rapists arrested ) केली आहे.
Minor Girl Raped : १७ दिवस लॉजमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार - बलात्कार करणार्या तिघांना अटक
सलग १७ दिवस लॉजमध्ये ( Rape lodge in Virar Arnala ) डांबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( Minor Girl Raped ) केल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी तिघाजणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी बेड्या ( Three rapists arrested ) ठोकल्या आहेत.

बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले -१५ वर्षांची ही पीडित तरुणी वसईत राहते. तिची ओळख लक्ष्मण शेट्टी याच्यासोबत झाली होती. शेट्टीने तिला १ नोव्हेंबर रोजी विरारच्या अर्नाळा येथील सी साईट नावाच्या लॉजींगमध्ये फूस लावून आणले होते. त्यांने तिला बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. यानंतर लक्ष्मण तेथून पसार झाला. या मुलीच्या असहायतेचा फायदा घेत लॉज चालक आकाश गुप्ता, कर्मचारी सुशांत पुजारी या दोघांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. तीला तिथे त्यांनी 17 दिवस कोंडून ठेवले होते. या प्रकाराची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली आहे. तिला डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.