पालघर -उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तारापूर स्फोट झालेल्या ठिकाणी भेट देऊन दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.
"तारापूर स्फोट प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार" हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा ७ वर
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारा नायट्रेट (एन. के. फार्मा) या कंपनीत रिअॅक्टरमध्ये स्फोट होऊन शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या बोईसर मधील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचाव पथकाकडून मदत केली जात आहे. तसेच घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, पालकमंत्री दादा भुसे आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भेट दिली.
प्राथमिक पाहणीत हा कारखाना अनधिकृत असल्याचे समोर येत असून सरकार बदलले त्याच्यामुळे आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नाही चुकेल त्याच्यावर कारवाई करू, असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले आहे.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर