महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला व बालविकास मंत्र्यांचा पालघर दौरा; अंगणवाड्यांना भेट, गरोदर मातांशी हितगूज - महिला व बालकल्याणमंत्र्यांचा पालघर दौरा बातमी

महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील बारोठी पाडा व इतर ठिकाणच्या अंगणवाड्यांना आज भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गरोदर मातांशी संवाद साधला त्याच बरोबर त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अंगणवाडीमधील भौतिक सुविधांबरोबर अनुदान निधी अमृत आहार योजना आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

महिला व बालकल्याणमंत्र्यांचा पालघर दौरा
महिला व बालकल्याणमंत्र्यांचा पालघर दौरा

By

Published : Jul 21, 2020, 8:24 PM IST

पालघर :राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज(मंगळवार) पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील अंगणवाड्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अंगणवाडी मधील सोयी सुविधा आणि अंगणवाडी सेविका व गरोदर मातांशी संवाद साधला. त्याच बरोबर कुपोषण मुक्तीसाठी निधीचा हातभार हा आदिवासी विभाग यांच्याकडून होतोय का हे ही विचाराधीन आहे असल्याचे मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज बोलताना माहिती दिली.

महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील बारोठी पाडा व इतर ठिकाणच्या अंगणवाड्यांना आज भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गरोदर मातांशी संवाद साधला त्याच बरोबर त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. अंगणवाडीमधील भौतिक सुविधांबरोबर अनुदान निधी अमृत आहार योजना आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

जिल्ह्यातील कुपोषण विषयावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, आम्ही बाळाच्या जन्माआधीपासून 1000 हजार दिवस गरोदर मातांशी समुपदेशन आणि बाळाचे संगोपन करीत आहोत. या विभागाला आदिवासी विभागाची किती मदत मिळतेय तेही आम्ही विचारात आहोत. त्याचबरोबर शासनाच्या अमृत आहार योजना अंमलबजावणसाठी होतेय की नाही याची माहिती, देण्यात येणारा अनुदान निधीचा विनियोग होतोय की नाही याची माहिती या दौऱ्यादरम्यान घेत आहोत. अशी माहती मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details