महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई- विरारमध्ये दूध व्यावसायिकाला जमावाची लाथा-बुक्क्यांनी मारहाण, घटना CCTV मध्ये कैद - पालघर ताज्या बातम्या

दूध व्यावसायिकाला आठ ते दहा तरुणांच्या जमावाने मारहाण करून बंदुकीच्या धाकाने त्याकडून दोन लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.

Virar latest news
Virar latest news

By

Published : Jul 23, 2021, 9:11 PM IST

Updated : Jul 24, 2021, 12:49 PM IST

पालघर - विरारमध्ये एका दूध व्यावसायिकाला आठ ते दहा तरुणांच्या जमावाने मारहाण करून बंदुकीच्या धाकाने त्याकडून दोन लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत दूध व्यावसायिकाला गंभीर दुखापत झाली आहे.

व्हिडीओ

घटना सीसीटीव्हीत कैद -

विरार पूर्वेच्या गणपती मंदिरासमोर दूध व्यावसायिक शिवकुमार सिंग यांचे 'जीवदानी मिल्क सेंटर' नावाने दुकान आहे. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात दूध वितरण केल्याच्या रागातून आरोपी रंजन पाटील व दिनेश पाटील यांनी आपल्या सोबत आठ ते दहा जणांना घेऊन दूधव्यावसायिक शिवकुमार यांना जबर मारहाण केली. यावेळी त्यांनी दूधव्यावसायिकाच्या खिशातून दोन लाख रुपयांची चोरी करून याबाबत कोणाला सांगितल्यास बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. ८ ते १० जणांनी केलेल्या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दूध व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात रंजन पाटील व दिनेश पाटील यांच्यासह इतर ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - Maharashtra Corona : रुग्णसंख्येत किंचित घट! ६७५३ नवीन रुग्ण, १६७ रुग्णांचा मृत्यू

Last Updated : Jul 24, 2021, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details