महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाताळ'च्या निमित्ताने सजल्या पालघरमधील बाजारपेठा; सजावटीच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल - नाताळ सणावर कोरोनाचे सावट

नाताळचा सण दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील बाजारपेठा गजबलेल्या आहेत, ख्रिसमस ट्री, विद्युत रोषणाई सजावटीच्या वस्तू खरेदी कऱण्यासाठी बाजारात लगबग दिसून येत आहे.

palghar
'नाताळ'च्या निमित्ताने सजल्या पालघरमधील बाजारपेठा

By

Published : Dec 23, 2020, 10:42 AM IST

Updated : Dec 23, 2020, 11:18 AM IST

पालघर/वसई - नाताळ सणाच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. त्या निमित्ताने विविध प्रकारच्या नवनवीन वस्तू पालघर शहरातील बाजारापेठा सजल्या आहेत. नातळासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गजबजलेल्या बाजारपेठांचा आढावा घेताल आहे ईटीव्ही भारत ने विशेष आढावा घेतला आहे.

'नाताळ'च्या निमित्ताने सजल्या पालघरमधील बाजारपेठा


नाताळचा सण म्हणजे सर्वच ख्रिस्ती बांधवांचा आनंदाचा सण

नाताळचा सण म्हणजे सर्वच ख्रिस्ती बांधवांचा आनंदाचा सण. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले होते. त्या प्रमाणे नाताळ सणावर देखील कोरोनाचे सावट आहेच. मात्र, सर्व ख्रिस्ती बांधवाकडून नाताळ निमित्ताने आकर्षक सजावटीच्या माध्यमातून नाताळचा सण साजरा करण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहे. त्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू वसई-विरार मधील दुकानात उपलब्ध झाल्या असल्याचे विक्रेत्या गोंसालवीस यांनी सांगितले.

'नाताळ'च्या निमित्ताने सजल्या पालघरमधील बाजारपेठा

ग्राहकांचाही त्या वस्तू खरेदी करण्याकडे मोठा कल-

नाताळ सणाच्यानिमित्ताने बाजारात आकर्षित वस्तू आल्या आहेत. दरवर्षी काही ना काही तरी नवीन वस्तू बाजारात येत असतात. त्यामुळे ग्राहकांचाही त्या वस्तू खरेदी करण्याकडे मोठा कल असतो. नाताळच्या या बाजारात ख्रिसमस ट्री, नाताळ गोठे, सांताक्लॉज, ख्रिसमस टोपी, स्नोमन, नाताळ तारा, रेन डीअर, लहान मुलांची विविध प्रकारची खेळणी, सजावटीसाठी लागणारे साहित्य अशा सर्व गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

'नाताळ'च्या निमित्ताने सजल्या पालघरमधील बाजारपेठा
या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी काहींनी आपले स्टॉलही सुरू केले आहेत. अशाप्रकारच्या स्टॉलमुळे एकाच ठिकाणी सर्व वस्तू ग्राहकांना मिळू लागल्या आहेत. यावर्षी करोनाचे संकट असल्याने काही दुकानदारांनी महिनाभर आधीच आपली दुकाने सुरू केली आहेत. जेणेकरून येणाऱ्या ग्राहकांची एकदाच गर्दी होणार नाही. यासाठी विशेष काळजी घेतली असल्याचे विक्रेत्या रोझी गोंसालवीस यांनी सांगितले.
Last Updated : Dec 23, 2020, 11:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details