महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्हा परिषद : मनीषा निमकर यांना सर्वाधिक मताधिक्क्य मिळण्याचा विश्वास - मनीषा निमकर

जिल्‍हा परिषदे अंतर्गत येणार्‍या सफाळे गटातून निमकर यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपने कोणताही उमेदवार दिला नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेचा सफाळे शहरात एकही बूथ लागला नसल्याचे पाहावयास मिळाले. आपल्या विरोधात असलेल्या शिवसेनेचे नेते प्रचारासाठीही फिरकले नाही. त्यांना आपला पराभव समोर दिसल्यामुळे सेनेची ही अवस्था झाल्याची प्रतिक्रिया निमकर यांनी दिली आहे.

palghar ZP election
मनीषा निमकर

By

Published : Jan 8, 2020, 8:40 AM IST

पालघर -माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. यासाठी मंगळवारी मतदान पार पडले. यावेळी निवडून येणाऱ्या सर्व सदस्यांपैकी आपण सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येऊ, असा विश्वास मनीषा निमकर यांनी व्यक्त केला. तसेच त्यांच्या विरोधात शिवसेनेचा एकही बूथ उभारला गेला नव्हता.

मनीषा निमकर यांना सर्वाधिक मताधिक्क्य मिळण्याचा विश्वास

जिल्‍हा परिषदे अंतर्गत येणार्‍या सफाळे गटातून निमकर यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपने कोणताही उमेदवार दिला नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेचा सफाळे शहरात एकही बूथ लागला नसल्याचे पाहावयास मिळाले. आपल्या विरोधात असलेल्या शिवसेनेचे नेते प्रचारासाठीही फिरकले नाही. त्यांना आपला पराभव समोर दिसल्यामुळे सेनेची ही अवस्था झाल्याची प्रतिक्रिया निमकर यांनी दिली आहे. मात्र, सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा त्यांचा हा विश्वास किती खरा ठरतो हे उद्या मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल.

मनीषा निमकर यांची राजकीय कारकिर्द -
गेल्या 1992 मध्ये पालघर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून निवडून येऊन मनीषा निमकर यांनी शिवसेनेतून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. 1995, 1993 व 2004 अशी शिवसेनेमधून आमदारकीची हॅट्रिक साधणार्‍या मनीषा निमकर यांना 2008 नंतर राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. सन 2009 मध्ये शिवसेनेकडून पुन्हा निवडणूक लढवताना पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीमुळे त्यांचा पराभव झाला होता. सन 2014 मध्ये त्यांनी पक्षांतर करून बहुजन विकास आघाडीतर्फे पालघर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. 2016 मध्ये झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देखील निवडणूक लढवली. मात्र, त्या पराभूत झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपप्रवेश केला होता. मात्र, निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय बदलानंतर तसेच भाजपमधील मंडळींनी मनीषा निमकर यांचा स्वीकार न केल्याने त्या एकाकी पडल्या.

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्याचे जाहीर झाल्यानंतर मनीषा निमकर यांनी आपली भूमिका पुन्हा बदलत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. त्यांनी सफाळे गटातून उमेदवारी मिळवली. आता पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर त्यांचे लक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details