महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरारमधील व्यक्तीची 'हौस', परदेशातून मागविला 'ब्ल्यूटूथ इअरफोन मास्क' - palghar latest corona update news

आपल्या विदेशात राहणाऱ्या मित्राकडून संदीप यांनी हे मास्क  मागविले आहे. या मास्कमधील ब्लूटूथसाठी चार्जिंग बॅटरीही सोबत देण्यात आली आहे. या मास्कचा सर्वाधिक फायदा हा दुचाकीस्वारांना  होणार असून या मास्कची किंमत एक हजारच्या घरात आहे. या मास्कचा वापर हा गाणी ऐकण्या सोबत फोन कॉलसाठीही होत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या मास्क नंतर आता ब्लुटूथ मास्कची चर्चा रंगू लागली आहे.

man use bluetooth earphones in the mask at virar palghar
आता मास्कमध्येही ब्ल्यूटूथ इअरफोन, विरारमधील व्यक्तीची 'हौस'

By

Published : Jul 21, 2020, 7:21 AM IST

Updated : Jul 21, 2020, 8:11 AM IST

विरार (पालघर) - कोरोनासारख्या महामारीत अनेकांनी आपआपल्या हौसेनुसार मास्क बनवून वापरले. तर काहींनी दिखाव्यासाठी चक्क सोन्या-चांदीचे मास्क तयार केले होते. मात्र, विरारमधील संदीप शिरवणकर या पठ्ठ्याने चक्क मास्कमध्ये इनबिल्ड ब्लुटूथ इअरफोनचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या मास्क नंतर आता ब्लूटूथ मास्क चर्चेचा विषय बनला आहे.

विरारमधील व्यक्तीची 'हौस', परदेशातून मागविला 'ब्ल्यूटूथ इअरफोन मास्क'
आपल्या विदेशात राहणाऱ्या मित्राकडून संदीप यांनी हे मास्क मागविले आहे. या मास्कमधील ब्लूटूथसाठी चार्जिंग बॅटरीही सोबत देण्यात आली आहे. या मास्कचा सर्वाधिक फायदा हा दुचाकीस्वारांना होणार असून या मास्कची किंमत एक हजारच्या घरात आहे. या मास्कचा वापर हा गाणी ऐकण्या सोबत फोन कॉलसाठीही होत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या मास्क नंतर आता ब्लुटूथ मास्कची चर्चा रंगू लागली आहे.कोविडसारख्या युद्धात मास्कचा वापर सरकारकडून बंधनकारक करण्यात आला. मास्क नसल्यास दंड स्वरूपात शिक्षा दिली जात आहे. असे असले तरी अनेक जण मास्कचा वापर न करताना दिसत आहेत. मात्र, या ब्लुटूथ मास्कमुळे नक्कीच सर्वजण मास्कचा वापर करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Jul 21, 2020, 8:11 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details