महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नालासोपाऱ्यातील हत्येचा 24 तासात उलगडा, तुळींज पोलिसांची कारवाई

नालासोपारा पूर्वेकडील राम रहिम नगर येथील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या तळमजल्यावर शनिवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदर घातपाचा तपास लावत 24 तासाच्या आत अटक केली आहे.

नालासोपाऱ्यातील हत्येचा 24 तासात उलगडा
नालासोपाऱ्यातील हत्येचा 24 तासात उलगडा

By

Published : Sep 8, 2020, 8:38 PM IST

पालघर :नालासोपारा येथे एका व्यक्तीचे अपहरण करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपींना तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आत अटक केली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सद्दाम सय्यद (वय ३२) असे आहे.

नालासोपाऱ्यातील हत्येचा 24 तासात उलगडा

नालासोपारा पूर्वेकडील राम रहिम नगर येथील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या तळमजल्यावर शनिवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, तुळींजचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या. पथकाने हालचाली करत मृत व्यक्तीची ओळख पटवली. अधिक चौकशी केली असता मृत सद्दाम सय्यद याचे दिपक मोरे नावाच्या व्यक्तीशी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. व त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्यातुन मृताला शनिवारी रात्री १२-१५ वाजण्याच्या सुमारास दिपक मोरे व त्याच्या साथीदारानी एका रिक्षातून तुळींजरोड नालासोपारा पूर्व येथून अपहरण करून रामरहीम नगर येथे नेले. तेथे तलवार, दांडके व दगडाने ठेचून त्याला ठार मारले.

याप्रकरणी काजल सैय्यद हिच्या तकरारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी कोणताही पुरावा, साक्षीदार नसताना रात्री उशिरा निर्जनस्थळी करण्यात आलेल्या हत्येचा तपास वारिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिघ्रगतीने केला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रशांत काटकर, प्रणय काटकर दीपक मोरे, नानु खडका, अमित कुमार या पाच जणांना अटक केली असून एक विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक जीजे वळवी, पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी, सहाय्यक फौजदार शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार युवराज जावळे, पो.ना. मोहन जाधव, पो.ना.नवनाथ तारडे, आनंद मोरे, पो.ना घेगडमल, संदीप शेरमाळे, प्रशांत सावदेकर, पो.ना. शेखर पवार, पो.कॉ गडाख. पो.कॉ योगेश नागरे, यांच्या पथकाने केली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -डहाणू-तलासरी परिसरात आज पुन्हा बसला भूकंपाचा धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details