पालघर -महाराष्ट्रात एका क्षुल्लक मुद्द्यावरून आईची हत्या ( Man held for killing mother in Palghar ) केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी एका 39 वर्षीय व्यक्तीला अटक केली.
आरोपी रुपेश गंगाणी हा दारू पिणारा होता आणि तो ७० वर्षांच्या आईशी शुल्लक कारणावरून वारंवार भांडत असे, असे तारापूर पोलीसांनी सांगितले.तारापूर येथील त्यांच्या घरी सोमवारी संध्याकाळी भांडणाच्या वेळेस आरोपीने आईवर लाकडाने हल्ला केला. आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचेही सांगितले.