पालघर (वसई)-वसई पश्चिमेकडे राहणाऱ्या ४५ वर्षीय पुरुषाला नोकरीचे आमिष दाखवून त्याच्या बँकेच्या खात्यातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. माणिकपूर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. वसई पश्चिमेकडील चुळणा रोडवरील तेजस अपार्टमेंटमध्ये राहणारे संजीव प्रकाश करवाडकर यांची 10 जूनला फसवणूक झाली होती.
नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक ! - man cheated with bair
वसई पश्चिमेकडे राहणाऱ्या ४५ वर्षीय पुरुषाला नोकरीचे आमिष दाखवून त्याच्या बँकेच्या खात्यातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. माणिकपूर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. वसई पश्चिमेकडील चुळणा रोडवरील तेजस अपार्टमेंटमध्ये राहणारे संजीव प्रकाश करवाडकर यांची 10 जूनला फसवणूक झाली होती.
त्यांना नोकरीची आवश्यकता असल्याने त्यांनी गुगलवर जाऊन पीकर जॉब या सोशल साइटवर अप्लाय केले होते. त्यांना आरोपीने फोन करून पिकर जॉब वेबसाईटवरून बोलत असून तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर रजिस्ट्रेशन करावे लागेल, असे सांगितले. नंतर त्यांच्या व्हाट्सअपवर लिंक पाठवून त्यांना ती ओपन करण्यास सांगून त्यात नाव पत्ता, बँक अकाउंट आणि क्रमांक मोबाईल क्रमांक टाकण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यातमधून १ लाख ५७ हजार ८५७ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.