पालघर- कोरोना व्हायरसवर औषध आपल्याकडे असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवणाऱ्या भोंदूला विक्रमगड पोलिसांनी अटक केली आहे. शशिकांत पांडे असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोरोनाचे आयुर्वेदिक औषध असल्याची अफवा पसरवणाऱ्या भोंदूला अटक - पालघर कोरोना
शशिकांत पांडे असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जगभरात कोरोना थैमान घातले असून यावर अजूनही लस उपलब्ध नाही. मात्र, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ टाकून आपल्याकडे कोरोनाचे आयुर्वेदिक औषध असल्याची अफवा या शशिकांत पांडे याने पसरवली होती.
विक्रमगड पोलिसांनी या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. विक्रमगड पोलीस ठाण्यात कलम 188, 505 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.