पालघर - धावत्या रेल्वेमध्ये परिचारिकाचा मोबाईल चोरीचा प्रयत्न करत विनयभंग करणाऱ्या एकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायलयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माहिती देताना पोलीस निरीक्षक रेल्वे मोबाईल चोरण्याचा प्रयत्न
डहाणू येथील आपल्या घरी येण्यासाठी तक्रारदार परिचारिका रविवारी (दि. 20 जू) रात्री आपले काम संपवून निघाली होती. विरारहून तिने रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी शेवटची मेमू रेल्वे पकडली. वाणगाव स्थानकाजवळ आरोपी महिला डब्यात शिरला. त्याने परिचारिकाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे स्टेशनवरच पोलिसांनी केली अटक
डहाणू स्टेशन येताच परिचारिकेने आरडाओरडा केला. मात्र, तिने सांगितलेल्या वर्णनावरुन रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि पळून जात असलेल्या आरोपीला पकडले. तरुणावर पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात चोरी आणि विनयभांगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी सांगितले.