पालघर -नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एक तरुणाचे एटीएम घेऊन त्यांच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार रुपये पोलिसांनी अटक केली. रोहित पांडे (वय.२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून विविध बँकेची ४७ एटीएम कार्ड, ७ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
पालघरमध्ये एटीएम कार्डद्वारे १० लाखाची फसवणूक; आरोपीस अटक - Hitesh Ramnath Rao
विरार येथील चांदीप गावात राहणारा प्रणित किरण पाटील (वय २२) हा आपला मावसभाऊ हितेश रामनाथ राव याचे बॅसीन कॅथलिक बँकेचे एटीएम कार्ड घेऊन नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये गेला होता. त्याला एटीएममधून पैसे काढता आले नाहीत. त्याचवेळी तिथे असलेल्या एका व्यक्तीने प्रणितला पैसे काढून दिले. मात्र, हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून घेतले.
विरार येथील चांदीप गावात राहणारा प्रणित किरण पाटील (वय.२२) हा आपला मावस भाऊ हितेश रामनाथ राव याचे बॅसिन कॅथलिक बँकेचे एटीएम कार्ड घेऊन नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये गेला होता. त्याला एटीएममधून पैसे काढता आले नाहीत. त्याचवेळी तिथे असलेल्या एका व्यक्तीने प्रणितला पैसे काढून दिले. मात्र, हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून घेतले. त्यानंतर १४ जून २०१९ ते ४ जुलै २०१९ या काळात हितेश यांच्या खात्यातून १० लाख ७३ हजार १०३ रुपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हितेश यांनी वालीव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
वालीव पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमले. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या रोहित पांडे याला अटक केली. त्याच्याकडून 47 एटीएम कार्ड व 7 लाख 90 हजार रुपये सोनेचांदी व रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.