पालघर - कोरोना संकट आणि त्यातच कोकणात आलेले चक्रीवादळ याबाबत राज्य सरकार गंभीर नाही. ते नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच 'सरकारमधील मंत्री घरात आणि जनता मात्र रस्त्यावर' अशी स्थिती आहे, असा आरोप भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. भाजपातर्फे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते येथे बोलत होते.
'कोरोनात महाराष्ट्रातील मंत्री घरात, जनता मात्र रस्त्यावर' - अतुल भातखळकर
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची मागणी केली आहे. राज्यात त्यांच्या सूचनांचे पालन महाविकास आघाडी सरकारने करावे, अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत भाजप नेते अतुल भातखळकर.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची मागणी केली आहे. राज्यात त्यांच्या सूचनांचे पालन महाविकास आघाडी सरकारने करावे. कोरोना संकटकाळात आम्ही सरकारसोबत आहोत. मात्र, जनतेच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही. ते आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारण करत आहेत, असा आरोपही भाजप नेते भातखळकर यांनी केला.
Last Updated : Jun 15, 2020, 7:41 PM IST