महाराष्ट्र

maharashtra

'वाडा तालुक्याचा आमदार' ही बिरुदावली विधानसभा निवडणुकीतून बाद

By

Published : Oct 26, 2019, 11:10 AM IST

Updated : Oct 26, 2019, 12:01 PM IST

वाडा तालुक्याला मिळालेले आमदार हे आता विक्रमगड, शहापूर, भिवंडी या मतदारसंघातील आहेत. यामुळे 30 वर्षांपासून वाडा तालुक्याचा आमदार, अशी असलेली बिरुदावली या निवडणुकीनंतर बाद झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील मतदारसंघाचे निकाल

पालघर - जिल्ह्यातील वाडा तालुक्याला तीन मतदारसंघात विभागले गेले आहे. 69 मतदान केंद्र भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तर 44 मतदान केंद्र विक्रमगड विधानसभा मतदारसंघात जोडली आहेत, तर 49 मतदान केंद्र ही शहापूर विधानसभा मतदारसंघाशी जोडले आहेत. यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या निकालातून शिवसेना, भाजप यांच्या वर्चस्वाला जसा धक्का लागला आहे, तसेच 'वाडा तालुक्याचा आमदार' ही बिरुदावलीही या निवडणुकीअंती संपुष्टात आली आहे.

वाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी

हेही वाचा.... कैद्यांनी तयार केलेल्या पणत्यांनी यंदाची दिवाळी तेजोमय होणार

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील निकाल भाजपसाठी धक्का देणारा ठरला, तर शहापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा शिवसेनेसाठी धक्कादायक ठरला. या दोन्ही ठिकाणी महाआघाडीच्या उमेदवारांनी मारलेली बाजी सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेनाच्या उमेदवाराविरोधात पोषक वातावरण तयार करण्यात महाआघाडी कमी पडली, यामुळे या जागेवर पुन्हा शिवसेनेचाच विद्यमान आमदार विजयी झाला. त्यामुळे वाडा तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार लाभला आहे.

हेही वाचा.... विजयाच्या जल्लोषात न रमता आमदार धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

माजी मंत्री विष्णू सावरा हे आमदार म्हणून वाडा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. या विधानसभा निवडणुकीत वाडा तालुक्यातील जवळपास 30 वर्षांपासून सावरा यांचे असलेले प्रतिनिधित्व कमी झाले. वाडा तालुका हा राजकारणात अग्रेसर असायचा.

हेही वाचा.... 'आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी देणार पाठींबा'

शहापूर विधानसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत घेतलेले निर्णय आणि उमेदवारी याबाबत काही शिवसैनिक नाराज होते. शहापूरातील शिवसैनिकांनी याला विरोधही केला होता. या मतदारसंघात सेनेची ताकद असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौलत दरोडांनी पांडूरंग बरोरांच्या मतावर दरोडा टाकून मोठा मताधिक्याने निवडून आले आहेत.

हेही वाचा.... क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका, अतिवृष्टीचाही इशारा

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल भुसारा यांनी पराभव केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे फारसे राजकीय प्राबल्य नव्हते. मात्र, महाआघाडीतील कम्युनिस्ट पक्ष आणि बविआच्या मतांची जादू चालल्याचे येथे सांगितले जाते. त्यातच मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत, हा प्रमुख मुद्दा प्रचारात राबवून महाआघाडीने प्रचार केला. तसेच मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सेना भाजपच्या ताब्यात असतानाही हा पराभव झाला आहे, यामुळे महायुतीच्या घटकपक्षाच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा.... अजित पवारांसह विश्वजीत कदमांचे मताधिक्य पाहून व्हाल थक्क...राज्यातील ५ विक्रमी विजयवीर

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधवी म्हात्रे उमेदवार होत्या. या मतदारसंघात वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्डेमय रस्ता, पाणी, रस्ते या समस्या तसेच रोजगाराच्याही समस्या आहेत. असे असतानाही महाआघाडीकडून यावर काही प्रचार करता आला नाही. तसेच बहुतेक कार्यकर्त्यांनी विक्रमगड आणि शहापूर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्यामुळे येथे पुन्हा एकदा शिवसेनेचे शांताराम मोरे यांनी जोरदार मुसंडी मारली.

Last Updated : Oct 26, 2019, 12:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details