पालघर - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र उत्साहात मतदान पार पडले असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये कैद झाले आहे. जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडला याचा निर्णय थोड्याच वेळात होणाऱ्या मतमोजणीनंतर समोर येणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
LIVE निकाल : पालघर जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ; ६ पैकी ३ जागेवर बहुजन विकास आघाडीचा विजय तर राष्ट्रवादीला १ आणि माकपला १ जागेवर यश
जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. यंदा जिल्ह्यात मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे आज समोर येणार आहे. पालघर जिल्ह्यात बविआ समोर प्रामुख्याने शिवसेनेचे आव्हान आहे.
LIVE UPDATE -
- ०४.४७ - विक्रमगडमधून राष्ट्रवादीचे सुनिल भुसारा, पालघरमधून श्रीनिवास वनगा, बोईसरमधून बविआचे राजेश पाटील, वसईमधून बविआचे हितेंद्र ठाकूर, नालासोपारामधून बविआचे क्षितीज ठाकूर आणि डहाणूमधून माकपचे विनोद निकोले विजयी
- ०४.४३ - पालघर जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ; ६ पैकी ३ जागेवर बहुजन विकास आघाडीचा विजय तर राष्ट्रवादीला १ आणि माकपला १ जागेवर यश
- ०४.०३ - डहाणू मतदारसंघातून भाजपच्या पास्कल धनारे पराभूत
- ०४.०२ - डहाणू मतदारसंघातून माकपचे विनोद निकोले ४३२१ मतांनी विजयी, भाजपच्या पास्कल धनारेंचा केला पराभव
- ०३.५९ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले चोवीसाव्या फेरी अखेर ४३२१ मतांनी पुढे
- ०३.४६ - बोईसर विधानसभा - बविआचे राजेश पाटील वीसाव्या फेरी अखेर २७७३ मतांनी पुढे
- ०३.३७ - बोईसर विधानसभा - बविआचे राजेश पाटील एकोणवीसाव्या फेरी अखेर २०२ मतांनी पुढे
- ०३.३७ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले एकवीसाव्या फेरी अखेर ४२३७ मतांनी पुढे
- ०३.०१ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले सतराव्या फेरी अखेर १८५६ मतांनी पुढे
- ०२.४५ - डहाणू विधानसभा - भाजपचे सोळआव्पाया फेरी अखेर पास्कल धनारे २७५ मतांनी पुढे
- ०२.१८ - नालासोपाऱ्यात बविआचे क्षितीज ठाकूर विजयाच्या उंबरठ्यावर
- ०२.११ - नालासोपारा विधानसभा - बविआचे क्षितीज ठाकूर चौदाव्या फेरी अखेर ३२९६१ मतांनी पुढे
- ०१.४४ - नालासोपारा विधानसभा - बविआचे क्षितीज ठाकूर चौदाव्या फेरी अखेर ३२९६१ मतांनी पुढे
- ०१.४२ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले चौदाव्या फेरी अखेर ४९६६ मतांनी पुढे
- ०१.०० - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले बारावी फेरी अखेर ३५३० मतांनी पुढे
- ०१.०० - नालासोपारा विधानसभा - बविआचे क्षितीज ठाकूर अकरावी फेरी अखेर २८३५० मतांनी पुढे
- १२.४९ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले अकरावी फेरी अखेर ३४२८ मतांनी पुढे
- १२.२२ - नालासोपाऱ्यात बविआच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
- १२.२२ - वसई विधानसभा - बविआचे हितेंद्र ठाकूर सातवी फेरी अखेर ९४०६ मतांनी पुढे
- १२.०१ - पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी
- ११.४५ - नालासोपारा विधानसभा - बविआचे पाचवी फेरी अखेर क्षितीज ठाकूर १४३१८ मतांनी पुढे
- ११.४५ - वसई विधानसभा - बविआचे हितेंद्र ठाकूर पाचवी फेरी अखेर ७६९८ मतांनी पुढे
- ११.३३ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले सातवी फेरी अखेर १२ मतांनी पुढे
- ११.२८ - पालघर विधानसभा - शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दहावी फेरी अखेर ३५२६ मतांनी आघाडीवर
- ११.२४ - वसई विधानसभा - बविआचे हितेंद्र ठाकूर चौथी फेरी अखेर ६६४९ मतांनी पुढे
- ११.२२ - नालासोपारा विधानसभा - बविआचे चौथी फेरी अखेर क्षितीज ठाकूर १०९९४ मतांनी पुढे
- ११.१८ - पालघर विधानसभा - शिवसेनेचे श्रीनिवास वनगा नववी फेरी अखेर २७०४ मतांनी आघाडीवर
- ११.१५ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले सहावी फेरी अखेर ३४४ मतांनी पुढे
- ११.१३ - बोईसर विधानसभा - शिवसेनेचे विलास तरे सहावी फेरी अखेर ६७८६ मतांनी पुढे
- ११.१२ - वसई विधानसभा - बविआचे हितेंद्र ठाकूर तिसरी फेरी अखेर ४८३८ मतांनी पुढे
- १०.५४ - नालासोपारा विधानसभा - बविआचे तिसरी फेरी क्षितीज ठाकूर ७४४३ मतांनी पुढे
- १०.५० - पालघर विधानसभा - शिवसेनेचे श्रीनिवास वनगा १९११ मतांनी आघाडीवर
- १०.५० - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले पाचवी फेरी २०८८ मतांनी पुढे
- १०.४४ - बोईसर विधानसभा - शिवसेनेचे विलास तरे पाचवी फेरी ५०८१ मतांनी पुढे
- १०.३२ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले चौथी फेरी ४९४ मतांनी पुढे
- १०.२९ - नालासोपारा विधानसभा - बविआचे दुसरी फेरी क्षितीज ठाकूर ३६४३ मतांनी पुढे
- १०.१९ - विक्रमगड विधानसभा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा १४८५४ मतांनी पुढे
- १०.११ - डहाणू विधानसभा - माकपचे विनोद निकोले तिसरी फेरी १६२९ मतांनी पुढे
- १०.०४ - पालघर विधानसभा - काँग्रेसचे योगेश नम ११३ मतांनी आघाडीवर
- १०.०१ - नालासोपारा विधानसभा - बविआचे क्षितीज ठाकूर १७२० मतांनी पुढे
- ०९.५० - विक्रमगड विधानसभा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा ८६४९ मतांनी पुढे
- ०९.४५ - पालघर विधानसभा - काँग्रेसचे योगेश नम ३०४ मतांनी आघाडीवर
- ०९.४३ - वसई विधानसभा - बविआचे हितेद्र ठाकूर ८६०० मतांनी पुढे
- ०९.४० - वसई विधानसभा - बविआचे हिंतेद्र ठाकूर ५१०० मतांनी पुढे
- ०९.३६ - डहाणू विधानसभा - पहिली फेरी भाजपचे पास्कल धनारे ९४० मतांनी पुढे
- ०९.३४ - पालघर विधानसभा - दुसरी फेरी काँग्रेसचे योगेश नम ७७४ मतांनी आघाडीवर
- ०९.२४ - बोईसर विधानसभा - शिवसेनेचे विलास तरे ७९० मतांनी पुढे
- ०९.१३ - पालघर विधानसभा - काँग्रेसचे योगेश नम १२३२ मतांनी आघाडीवर
- ०९.०६ - पालघर विधानसभा - काँग्रेसचे योगेश नम आघाडीवर
- ८.४९ - राष्ट्रवादीचे सुनिल भुसारा ४६२२ मतांनी आघाडीवर
- ८.३९ - विक्रमगड विधानसभा - पहिली फेरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल भुसारा ३४४४ मतांनी पुढे
- ८.१० - पोस्टल मतमोजणीला सुरूवात
जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. यंदा जिल्ह्यात मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे आज समोर येणार आहे. पालघर जिल्ह्यात बविआ समोर प्रामुख्याने शिवसेनेचे आव्हान आहे. २१ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात जिल्ह्यात ५९.३२ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात सहा पैकी तीन मतदारसंघात बविआचे वर्चस्व आहे. नालासोपाऱ्यात एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असून सगळ्या राज्याचे याकडे लक्ष लागले आहे.