महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नई दिशा संघटनेच्या सदस्यांनी हरवलेल्या आजीबाईंना पोहचवले घरी - नई दिशा संघटना बातमी

हंसाबाई परदेसी या 75 वर्षीय आजीबाई अहमदाबाद येथून मुंबईला परतताना चुकून विरार रेल्वे स्थानकात उतरल्याने हरवल्या होत्या. त्यांना 'नई दिशा संघटने'च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटे त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

मुंबई
मुंबई

By

Published : Oct 14, 2020, 3:31 PM IST

पालघर/विरार - मुंबई सेंट्रल येथे राहणाऱ्या 75 वर्षीय आजीबाई अहमदाबाद येथून मुंबईला परतताना चुकून विरार रेल्वे स्थानकात उतरल्या. मात्र, पुढे कुठे जायचं या विचारात रस्ता भरकटल्या. सुदैवाने 'नई दिशा संघटने'च्या कार्यकर्त्यांनी मुंबई सेंट्रल येथील आजीबाईच्या घरच्यांशी संपर्क साधत त्यांना ताडदेव पोलिसांच्या मदतीने मंगळवारी पहाटे नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

हंसाबाई परदेसी या 75 वर्षीय आजीबाईंचे नाव आहे. त्या आपल्या कुटुंबासोबत मुंबई सेंट्रल येथे राहतात. पंधरा दिवसांपूर्वी घरातील कोणालाही न सांगता त्या एकट्याच रेल्वेने अहमदाबाद येथे गेल्या होत्या. अहमदाबादमध्ये माझी मालमत्ता आहे, असे त्या कुटुंबीयांना नेहमी सांगत. त्यामुळे त्यांच्या जाण्यावर कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले होते. सोमवारी हंसाबाई अहमदाबाद येथून ट्रेनने मुंबईला परतताना चुकून विरार रेल्वे स्थानकात उतरल्या.

तेथून त्या जिवदानी मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सहकार नगर येथे गेल्या. रात्री 11 वाजता घाबरलेल्या अवस्थेतील आजीबाईना एकटेच बसलेले पाहिल्यावर नई दिशा स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे सदस्य रेहमत खान यांनी त्यांची विचारपूस केली आणि आजीबाईंच्या मदतीसाठी संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र मळेकर यांना बोलावून घेतले.

हंसाबाई यांनी आपण मुंबई सेंट्रल येथे राहत असल्याचे सांगितले. कुटुंबातील कुणाचाही संपर्क त्यांच्याकडे नव्हता. पूर्वी मुंबई सेंट्रल येथे राहणाऱ्या मात्र, सध्या सहकार नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका महिलने हंसाबाई परदेसी यांना ओळखलं. यावेळी संबधित महिलने मुंबई सेंट्रल येथील ओळखीच्या लोकांशी संपर्क साधत, हंसाबाई यांच्या कुटुंबीयांचा संपर्क मिळवला.

विरू मळेकर यांनी आपल्या गाडीमधून हंसाबाईना रात्री 12 वाजता मूंबई सेंट्रलला जाण्यासाठी विरारला सोडले. त्याच्यासोबत सहकारी निलेश चौकेकर, संदेश चौकेकर, रेहमत खान, सरोज होते. यावेळी माऊली टूर्स आणि ट्रॅव्हलचे संकेत, रोहीत आणि कुणाल हे सतत आजीच्या नातवाशी संपर्कात होते. मुंबई सेट्रल येथील मराठा मंदीराजवळ रात्री 2 वाजता आजीचे दोन नातु आल्यानंतर विरू मळेकर यांनी त्यांना सोबत घेत, ताडदेव पोलीस ठाणे गाठले. पोलीस कर्मचारी संदीप भगवान फूंदे यांना सदर प्रकार सांगितल्यावर आजीची आणि नातवांची ओळख पटवण्यात आल्यानंतर आजीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details